भारतीय
रेल्वेची उपयोगी माहिती
नमस्कार मित्रांनो,
आपणा सर्वांना
रेल्वे खूप खूप आवडते.रेल्वेत बसून प्रवास करायला आवडणार नाही असा एकही माणूस
शोधूनही सापडणार नाही. आपण नेहमी बघतो कितीतरी चित्रपटांमध्ये रेल्वे दाखवलेली
असते. एवढेच काय तर मामाच्या गावाला जाण्यासाठी रेल्वे गाडी चे गाणे आपणा सर्वांना
परिचित आहे... झुक झुक झुक झुक आगीनगाडी... धुरांच्या रेषा हवेत काढी.. पळती झाडे
पाहूया.. मामाच्या गावाला जाऊया.. हे गाणे ऐकले नसेल असा माणूस शोधूनही सापडणार
नाही. लहान मुलांना तर रेल्वेचे भारी आकर्षण असते. आपल्या देशात रेल्वे हे
दळणवळणाचे सर्वात प्रमुख साधन मानले जाते. मुंबईतील लोकल रेल्वेगाड्या तर मुंबईतील
प्रत्येक व्यक्तीच्या जीव की प्राण... आजकाल कितीतरी मोठ्या शहरांमध्ये लोकल आणि
मेट्रो रेल्वे गाड्या हया प्रवासी वाहतुकीचा कणा बनलेल्या आहेत. रेल्वे गाडया
कितीतरी प्रकारच्या असतात. पॅसेंजर गाडी, एक्सप्रेस गाडी
असे शब्द आपण कितीतरी वेळा ऐकतो. शताब्दी एक्सप्रेस, राजधानी
एक्सप्रेस अशी नावेही आपण ऐकलेले असतात व पेपरात
वाचलेली असतात. रेल्वेचे डबे हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात.जनरल कोच, स्लीपर कोच, एसी कोच हे त्यातलेच काही प्रकार.. हे
आपल्याला माहिती आहेच. भारतासारख्या खंडप्राय उत्तर दक्षिण व पूर्व पश्चिम लांबी
असलेल्या या देशात रेल्वेचे खूप मोठे जाळे पसरलेले आहे हे मला काही पुन्हा
सांगण्याची गरज नाही. भारतीय रेल्वेचे वेगवेगळे झोन
आणि त्यातही डिव्हिजन पाडलेले आहेत याची आपणाला पुरेशी माहिती असणे गरजेचे आहे
त्यामुळे मी या पोस्ट मध्ये रेल्वे बद्दल मनोरंजक आणि उपयोगी अशी वेगळ्या प्रकारची
माहिती लिहिण्याचा प्रयत्न केला आहे . चला तर मग सर्वप्रथम आपण भारतीय रेल्वेचे
किती आणि कोणकोणते झोन आहेत व त्यांचे मुख्यालय कोठे आहे हे सर्वप्रथम समजून घेऊया
व लक्षात ठेवूया .
1) Central Railway - मुंबई CSTM
2) West Central Railway -जबलपूर
3) Western Railway-चर्चगेट, मुंबई
4) Konkan Railway- नवी मुंबई
5) Northern Railway- दिल्ली
6) North Eastern Railway- गोरखपुर
7) North Central Railway- प्रयागराज
8) North Western Railway- जयपुर
9) North East Frontier
Railway- गुवाहाटी
10) Southern Railway- चेन्नई
11) South Western railway- हुबळी
12) South Eastern Railway- गार्डन रीच, कोलकत्ता
13) South Coast Railway- विशाखापटनम
14) South Central Railway- सिकंदराबाद
15) South East Central
Railway- विलासपूर
16) Eastern Railway- फिरली पॅलेस कोलकत्ता
15) East Coast Railway- भुवनेश्वर
18) East Central Railway- हजीपुर
आता रेल्वेच्या वरील प्रत्येक
झोनमध्ये काही डिव्हिजन असतात. भारतीय रेल्वेचे एकूण सत्तर डिव्हिजन्स आहेत.
त्यांची नावे कोण कोणती आहेत आणि कोणत्या झोन मध्ये कोणते डिव्हिजन आहे हे शोधायचा
प्रयत्न करा....
आपण उदाहरणादाखल दक्षिण मध्य
रेल्वे (South Central Railway) मध्ये कोणकोणती डिव्हिजन्स (Divisions)
आहेत ते पाहूया...
दक्षिण मध्य रेल्वे मध्ये एकूण
सहा Divisions आहेत...
1) गुंटकल
डिव्हिजन
2) गुंटूर
डिव्हिजन
3) नांदेड
डिव्हिजन
4) सिकंदराबाद
डिव्हिजन
5) हैदराबाद
डिव्हिजन
6) विजयवाडा
डिव्हिजन
चला आता आपण रेल्वे विषयी इतर
काही मनोरंजक आणि महत्वपूर्ण माहिती पाहूया...
1. भारतीय रेल्वे
मार्गाची एकूण लांबी 67368 किलोमीटर आहे.
2. भारतीय रेल्वे
हे आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे तर जगातील दुसर्या क्रमांकाचे
सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे.
3. भारतात एकूण 7325
रेल्वे स्थानके आहेत.
4. हावडा- अमृतसर
ही एक्सप्रेस गाडी सर्वात जास्त स्थानकांवर थांबणारी एक्सप्रेस गाडी आहे ती हावडा
वरून अमृतसर ला जाताना 115 ठिकाणी थांबते.
5. हावडा हे
भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे जंक्शन आहे. दररोज येथे
974 ट्रेन थांबतात.
6. विवेक
एक्सप्रेस ही भारतातील सर्वात जास्त अंतर कापणारी रेल्वे गाडी आहे ती 4 273
किलोमीटरचे अंतर कापते.
7. दररोज
साधारणपणे 25 लाख भारतीय लोक रेल्वेने प्रवास करतात.
8. 16 एप्रिल 1853
रोजी पहिली भारतीय प्रवासी रेल्वे धावली व ती मुंबई आणि ठाणे या दोन
रेल्वे स्थानकादरम्यान धावली.
9. हावडा-
धनबाद ही भारतातील पहिली डबल-डेकर ट्रेन आहे. ती 1 ऑक्टोबर 2011 रोजी सुरू झाली.
10. अमेरिका आणि
इंग्लंड नंतर डबल डेकर ट्रेन वापरणारा भारत हा जगातील तिसरा देश आहे.
11. वंदे भारत
एक्सप्रेस ही भारताची सर्वात वेगाने धावलेली ट्रेन आहे. चाचणी दरम्यान तिने 180
किलोमीटर प्रति तास या हा वेग पकडला.
12. गतिमान
एक्सप्रेस ही भारताची सर्वात वेगवान ट्रेन आहे. ती प्रति तास 160 किलोमीटर या वेगाने धावते.
13. ब्रॉडगेज,
नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज आणि मीटर गेज हे चार
प्रकारचे गेज भारतीय रेल्वेत वापरले जातात.
14. Ib हे
भारतातील सर्वात लहान नाव असलेले रेल्वे स्टेशन आहे.
15.
Venkatanarasimharajuvaripeta हे भारतातील सर्वात मोठे नाव असलेले
रेल्वे स्टेशन आहे.
16. बोगिबिल हा
भारतीय रेल्वे ट्रॅक वरील सर्वात लांब पूल आहे त्याची लांबी4.9 किलोमीटर आहे.
17. घूम रेल्वे
स्टेशन हे भारतीय रेल्वेचे सर्वात उंचीवरील रेल्वे स्थानक आहे. याची उंची
समुद्रसपाटीपासून 2258 मीटर आहे.
18. WAG12B हे
भारतीय रेल्वेचे सर्वात जास्त शक्तिशाली रेल्वे इंजिन
आहे. त्याची क्षमता 12 हजार हॉर्सपॉवर एवढी आहे.
19. महाराजा
एक्सप्रेस ही भारतातील सर्वात महागडी रेल्वे आहे.
20. The Grand Trunk Express ही भारतातील सर्वात जुनी रेल्वे गाडी आहे. ती 1929 साली
सुरू झाली आणि आजतागायत ती नियमितपणे दिल्ली आणि चेन्नई या दोन
स्थानका दरम्यान धावते.
धन्यवाद !